डहाणू/बोर्डी - रविवार 3 जून रोजी दुपारी 1 वाजता पालघर लायन्स क्लब काँग्रेस मैदान येथे बुलेट ट्रेन विरोधी जनमंचचे आयोजन करण्यात आले आहे. या जनमंचवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष,माकप, जनता दल(से)आदी विविध राजकीय पक्षाचे राज्य आणि देश पातळीवरील नेते उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत. महाराष्ट्र व गुजरात मधील संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या करिता डहाणू आणि सीमा भागातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने डहाणू रोड रेल्वे स्थानकात सुरक्षात्मक उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून छावणीचेच रूप प्राप्त झाले आहे.
आज पालघर येथे बुलेट ट्रेन विरोधी जनमंच, डहाणू रोड रेल्वे स्थानाकाला छावणीचे रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 11:49 IST