वाड्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: March 15, 2016 01:02 IST2016-03-15T01:02:40+5:302016-03-15T01:02:40+5:30
वाडा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून हा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

वाड्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
वाडा : वाडा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून हा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
शुक्रवार दि. १८ मार्च रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २९ मार्च ते २ एप्रिल. ३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत अर्जांची छाननी. ४ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह वाटप १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
वरील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचाची पदे आरक्षित आहेत. कुडूस, सापरोंडे, कोंढले, नारे, वडवली, घोणसई, डाकिवली, केलठण, बिलावली, देवघर, खानिवली, अशा एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.
(वार्ताहर)