प्राण्यांची शिंगे विकणारे अटकेत
By Admin | Updated: October 28, 2016 02:25 IST2016-10-28T02:25:56+5:302016-10-28T02:25:56+5:30
सुमारे दीडशे वर्षांपूर्वींची प्राण्यांची शिंगे आणि सुळे यांची बेकायदेशिर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुंगारेश्वर फाटा येथून अटक केली.

प्राण्यांची शिंगे विकणारे अटकेत
विरार : सुमारे दीडशे वर्षांपूर्वींची प्राण्यांची शिंगे आणि सुळे यांची बेकायदेशिर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुंगारेश्वर फाटा येथून अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख ८९ हजार २०० रुपयांची शिंंगे व सुळे जप्त करण्यात आली.
निरीक्षक अशोक होनमाने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेदपाठक, हवालदार प्रदीप पवार, संदीप मोकल, जनार्दन मते, रामचंद्र पाटील, शंकर वळवी, मनोज मोरे, प्रवीण पाटील, दोरकर, विकास यादव, तटकरे, कोरे यांच्यासह सापळा रचला होता. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस पथकाने सलीम अहमद तांबे (४५, रा. उदयनगर, जि. रत्नागिरी) आणि गुलाम हुसेन शेख (३८, रा. वसई) दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. ही शिंगे व सुळे दीडशे वर्षांपूर्वींचे असून ते वनक्षेत्रपालाच्या ताब्यात देण्यात आले. (वार्ताहर)