शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 09:09 IST

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

पारोळ : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दररोज शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण समोर येत आहेत. सध्या वसई तालुक्यातील रुग्णसंख्या ६० हजारांच्या वर गेली असून, यात १ हजार २०७ नागरिकांचा बळी गेला आहे. ४८ हजारांच्या वर बरे झाले असले तरी आज ११ हजारहून जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. असे असताना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र लसींअभावी सोमवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. जर लसीकरणाला ब्रेक लागला तर कोरोना प्रादुर्भाव रोखणार कसा, असा प्रश्न विचारला जात आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. वसई-विरारमधील लसीचा साठा संपल्याने लसीकरण मंदावले होते. रविवारी उशिरा लसींचा साठा वसई-विरारमध्ये दाखल झाला आहे. मात्र लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील आणि कोरोना नियमांचे उल्लंघन होईल, अशी भीती असल्याने सोमवारी महापालिकेकडून लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण लसीकरणाविनाच घरी परतले. वसई तालुका हा शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्याने महापालिका क्षेत्रातील लसीकरण हे मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.वसई ग्रामीण भागात बुधवारी लसीकरण सुरू होईल, अशी तालुका आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली. शहरी भागात आरोग्य विभाग प्रथम प्राधान्य देत असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर डोसही कमी येतात. काहीवेळा आठवड्यात एका दिवशी लसीकरण होत असते. त्यात डोस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या कोरोना लाटेचा गावातसुद्धा प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरणाचा वेग ब्रेक न लागता वाढवण्याची गरज आहे. महापालिका क्षेत्रात १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण तीन केंद्रांवर सुरू झाले असून, याचा लाभ खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्यांना होत आहे, तर ग्रामीण भागात या वयोगटातील लसीकरण सुरू न झाल्याने तरुणांना लसीकरणाला मुकावे लागत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर