अंगणवाडी सेविका-मदतनीस मानधनापासून वंचित
By Admin | Updated: September 29, 2015 23:39 IST2015-09-29T23:39:47+5:302015-09-29T23:39:47+5:30
येथील जवळपास चौसष्ट अंगणवाडीतील सेविका आणि मदतनिसांना शासनाकडून मिळणारे पूर्ण मानधन गेल्या वर्षभरापासून न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

अंगणवाडी सेविका-मदतनीस मानधनापासून वंचित
खर्डी : येथील जवळपास चौसष्ट अंगणवाडीतील सेविका आणि मदतनिसांना शासनाकडून मिळणारे पूर्ण मानधन गेल्या वर्षभरापासून न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
अंगणवाडी सेविकांना ५१०० रु पये व मदतनिसांना २००० रु पये मानधन शासना कडून मिळते. मात्र सप्टेंबर २०१४ पासून पूर्ण मानधन न देता सेविकांना सप्टेंबर २०१४ ते जून२०१५ पर्यंत केवळ ३००० रु पये तर मदतनिसांना १०० रु पये मिळले असून त्यानंतर म्हणजे जुलै २०१५ पासून कोणत्याही प्रकारचे मानधन मिळाले नसल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात त्यांच्या कुटूंबाला अर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच शासनाकडून मिळणारी दिवाळीची भाऊबीज भेटही गेल्या वर्षापासून मिळालेली नाही. (वार्ताहर)