महाराष्ट्रातील आंगणवाडया जाणार सातासमुद्रा पलीकडे
By Admin | Updated: September 3, 2014 23:25 IST2014-09-03T23:25:58+5:302014-09-03T23:25:58+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात.

महाराष्ट्रातील आंगणवाडया जाणार सातासमुद्रा पलीकडे
मनोर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात. त्याची कार्यपद्धत माहिती घेण्यासाठी साऊथ अफ्रिकेची महिला अधिकारी सिरीन यांनी सातिवली, दुर्वेस गावाला भेट देऊन सर्व प्रश्न जाणून घेतले. त्यावेळी दुर्वेस सातिवली अंगणवाडीमध्ये पुरक पोषण आहार सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ग्रामीण आदिवासी भागातील अंगणवाडय़ा मार्फत कुपोषणाचे प्रमाण कशा पद्धतीने कामे केली जातात, मातेच्या उदरात बाळाचे योग्य वाढ होण्यासाठी गरोदर महिला व किशोरवयीन मुलींनी कोणती काळजी आहार घ्यावे असे विविध कार्यपद्धत चा अढावा घेण्यासाठी साऊथ अफ्रिका या देशातून संबंधित खात्याचे महिला अधिकारी सिरीन व त्यांचे इतर अधिका:यांनी दुर्वेस, सातिवली अंगणवाडीमध्ये भेट देऊन सर्व माहितीचा आढावा घेतला. त्यावेळी बिज अंकुरे अंकुरे व पुरक पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आयोजित केले होते.
त्यावेळी विविध प्रदर्शने मांडण्यात आले होते. मनोरंजनासाठी ताडपा पाच आदिवासी बांधव व महिलांनपी साजरा केला. त्यामध्ये स्वत: सिरीन सुद्धा नाचले त्यावेळी सिरीन म्हणाले की मी अंगणवाडी मार्फत कार्यपद्धतीचासंपूर्ण आढावा घेतला आहे. मला सर्व उपक्रमे आवडली आहेत. त्याचा उपयोग साऊथ अफिकेमध्ये करणार तेथील महिलांनी प्रशिक्षण देऊन बाळ सुदृढ होण्यासाठी तसेच महिलांनी गरोदर काळात घेण्याची काळजी असे विविध विषयी संदर्भात भारताचा आढावा अफ्रिकेमध्ये चालविणार. एकात्मिक बालविकास सेवा योजनाविभाग मनोर तर्फे सातिवली व दुर्वेस अंगणवाडीमध्ये पुरक पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आयेाजित करण्यात आले होते. त्यामध्ये विजय सूर्यवंशी सीओ पालघर जिल्हा परिषद, प्रविण भावसार,नंदकुमार वाळेकर, प्रकल्प अधिकीर मनोर, मुख्य सेविका प्रणालीसातवी, अश्विनी गलांडे, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीससह
ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)