अन् रोहित अर्धा किमीर्पयत फरफटत गेला
By Admin | Updated: September 4, 2014 10:54 IST2014-09-04T02:59:13+5:302014-09-04T10:54:52+5:30
टिळकनगर येथील अशाच एका घटनेत रोहित बटनवाला हा 19 वर्षीय मुलगा लोकलच्या धडकेत तब्बल अर्धा किलोमीटर्पयत फरफटत गेला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

अन् रोहित अर्धा किमीर्पयत फरफटत गेला
मुंबई : रुळ ओलांडू नका, धोकादायक असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केली जात असतानाही अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. टिळकनगर येथील अशाच एका घटनेत रोहित बटनवाला हा 19 वर्षीय मुलगा लोकलच्या धडकेत तब्बल अर्धा किलोमीटर्पयत फरफटत गेला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रूळ ओलांडणो किती धोकादायक असू शकते, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
याबाबत वडाळा रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. के. ढावरे यांनी सांगितले, की 1 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत अॅन्टॉप हिल येथे राहणारा रोहित हा 19 वर्षीय मुलगा सव्वापाचच्या सुमारास चेंबूर आणि टिळकनगरदरम्यान असणा:या रोड ओव्हर ब्रिजजवळ आला आणि तेथून रूळ ओलांडत होता. मात्र त्याचवेळी चेंबूर स्थानकाच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून सीएसटीकडे जाणा:या लोकलचा अंदाज न आल्याने त्याची जोरदार धडक रोहितला बसली. ही धडक एवढी जोरदार होती, की त्यामुळे रोहित हा अर्धा किलोमीटर्पयत फरफटत जाऊन टिळकनगर स्थानकाजवळ आला. यात तो जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तरांना दहा मिनिटांत मिळाली. रोहितच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्याचे दोन हात मिळत नसल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचा:याने एका बुटपॉलिशवाल्याला सोबत घेऊन शोध घेतला. त्यावेळी एक हात चेंबूर स्थानकाजवळ तर दुसरा हात टिळकनगर स्थानकाजवळ सापडला. त्यानंतर शरीराचे सर्व
भाग एकत्र गोळा करण्यात आले.
या घटनेची वडाळा रेल्वे
पोलीस स्थानकात अपघाती
नोंद झाली असल्याचे सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
च्रोहितचे वडील सायन रुग्णालयात काम करतात. रोहित हा कॉलेजमध्ये शिकत होता. अॅन्टॉप हिल येथे राहणारा रोहित त्या दिवशी कॉलेजमधून घरी जात होता. त्या वेळी रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे रेल्वे पोलीस सांगतात.
रुग्णवाहिकेला झाला उशीर?
टिळकनगर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवल्यानंतर ती येण्यास बराच उशीर झाला. साधारण 40 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याचे सूत्रंकडून सांगण्यात येते.