शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईत मित्राचा खून करुन पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला ५ वर्षानंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:57 IST

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

मंगेश कराळेनालासोपारा : चेन्नईत मित्राचा खून करून पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला तब्बल ५ वर्षांनंतर वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने गुरुवारी अटक केली आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.

चेन्नई स्थित तम्बरम शहरातील टी - १९ केलमबक्कम पोलीस ठाण्यातील हत्येच्या दाखल गुन्हयातील संशयीत आरोपीत रघू दूघई मंडऴ याचा तामिळनाडु पोलीस मागील ५ वर्षापासुन सातत्याने शोध घेत होते. आरोपीताच्या शोधार्थ तामिळनाडु पोलीसांना अनेक वेळा बिहार राज्यात शोध मोहिम राबविली होती. परंतु पोलीसांना आरोपीचा शोध घेण्यात यश येत नव्हते. गुरुवारी तामिळनाडू पोलीसांचे एक विशेष पथक आरोपीच्या शोधार्थ वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाले.त्याअनुषंगाने वालीवचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी आरोपीचा शोध घेण्याचे अनुषंगाने तामिळनाडू पोलीसांकडून माहिती संकलीत केली. वालीव पोलिसांनी स्वत:चे खब-यांचे जाळे सक्रिय करुन बातमीदाराने दिलेल्या माहितीचे आधारे आरोपी रघु मंडल हा वसईतील एका बफिंग कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती प्राप्त केली. तदनंतर, स्वत:च्या मित्राच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीत रघु मंडल यास वालीव पोलीसांनी यशस्वीपणे ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रींगी,  सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.

नेमकी काय होती घटना

आरोपी रघु मंडल व त्याचा मित्र अनिल चौधरी हे दोघे चेन्नईतील बफिंग कंपनीत एकत्र काम करुन एकाच रुममध्ये एकत्र वास्तव्यास होते. परंतु कालांतराने दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होऊन त्यांचे आपसात भांडण झाले. त्या भांडणाचा रघु मंडलने मनात राग धरुन १४ सप्टेंबर २०१८ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास एकाच रुममध्ये एकत्र झोपलेला असतांना रघु मंडलने अनिल चौधरी याचा धारदार चाकूने गळा कापून खुन केला होता. तद्नंतर, आरोपी अनिलचा मृतदेह असलेल्या रुमला बाहेरुन लॉक लावून पळून गेला. तामिळनाडू पोलीसांनी खुनाच्या गुन्हाचे तपासात आरोपीने केलेल्या गुन्हयाचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी