शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोना रुग्णाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला पापडी येथे भीषण अपघात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 22:16 IST

नशीब बलवत्तर ; रूग्ण व चालक बचावले ; रुग्णवाहिकेचे मोठं नुकसान

वसई/विरार - वसईत एका कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेताना वसई-विरार महापालिकेच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली आहे. वसई पश्चिमेच्या पापडीच्या स्टेटस हॉटेल समोर हा अपघात घडला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे समजते

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील एका कोरोनाबाधित रुग्णास उपचारासाठी वसईच्या जी.जी कॉलेज येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यासाठी वसई महापालिकेची रुग्णवाहिका निघाली होती. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पापडी येथील स्टेटस हॉटेलपर्यंत ती पोहचताच या रुग्णवाहिकेचा एक्सेल निखळून पडला व धाडकन ही रुग्णवाहिका रस्त्यावरील डाव्या बाजूच्या खांबाला जावून आदळली. या रुग्णवाहिकेत एकच रुग्ण होता तर सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रुग्णवाहिकेचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

दरम्यान लागलीच रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखीत दुसरी रुग्णवाहिका बोलावून त्या रुग्णाला कोविड सेंटर मध्ये पाठवले. मात्र, आता नेमकी यात चूक कुणाची अथवा रुग्णवाहिका व्यवस्थित होती की नाही हे तपासून बघण्याची जबाबदारी पालिका वाहन विभागाची असताना अर्थातच या अपघात घटनेनंतर महापालिकेच्या रुग्णवाहिकेच्या दुरुस्ती व डागडुजीचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईAccidentअपघात