शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

युती-आघाडीचा फैसला ३० डिसेंबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:56 PM

अर्ज छाननी : जिल्हा परिषदेसाठी ३६१ तर पं. स.साठी ६५३ नामनिर्देशनपत्र वैध

पालघर/डहाणू : पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून मंगळवारी झालेल्या छाननीनंतर वैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पालघरच्या ८८ नामनिर्देशन पत्रापैकी ८७ वैध झाली आहेत. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कुणासमोर लढणार, तसेच युती आणि आघाडीचे समीकरण समजणार आहे.

डहाणू जिल्हा परिषदेसाठी ७० आणि पंचायत समितीसाठी ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी आॅनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी ७१, तर पंचायत समितीच्या २६ गणांसाठी ११५ नामनिर्देशन पत्र भरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सौरभ कटियार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग यांनी दिली. नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवारी करण्यात आली. त्यात जि.प. गटातील एक, तर पंचायत समितीच्या गणातील दोन नामनिर्देशन पत्र बाद ठरविण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात ७०, तर पंचायत समितीच्या रिंगणात ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.जव्हारमध्ये जि.प.चे २० तर पं.स.चे ४१ उमेदवारी अर्ज ठरले वैधजव्हार : जव्हार तालुक्यातील जि.प. पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठीचे २० उमेदवारी अर्ज वैध ठरले असून पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये अनेक अपक्ष आणि वाटाघाटीच्या हिशोबाने भरलेले उमेदवारी अर्ज दाखल असल्याने अर्ज माघारीच्या दिवशीच या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जव्हारमध्ये तूर्तास तरी महाआघाडीच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी बविआ आणि काँग्रेसचे जागा वाटप झालेले असून भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असल्याचे चित्र आहे. जव्हारमध्ये झेडपीच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. वावर गणातील पंचायत समितीकरिता वय कमी असल्यामुळे बाद करण्यात आला तर न्याहाळे येथील जात पडताळणी नसल्यामुळे २ अर्ज बाद करण्यात आले.वाडा पं.स.तील एक अर्ज बादवाडा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. या वेळी मोज गणातून लोकेश रामचंद्र पाटील यांनी सूचकाचे नाव दुसऱ्या गणातील व्यक्तीचे टाकल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे आता १३१ उमेदवारी अर्ज वैध राहिले. अर्ज मागे घेण्याची तारीख ३० डिसेंबर आहे.तलासरीतही चार अर्ज अवैधतलासरी : तलासरीत जिल्हा परिषद गटाच्या पाच आणि पंचायत समितीच्या १० गणांच्या जागांसाठी एकूण ८७ उमेदवारी अर्जदाखल झाले आहेत. त्या अर्जाची छाननी मंगळवारी तहसील कार्यालयात होऊन जि. प. गटातील ३० अर्जापैकी उधवा गटातील १ अर्ज बाद झाला, तर पंचायत समिती गणांच्या ५७ अर्जांपैकी झरी, डोंगारी, उधवा या तीन गणांतील प्रत्येकी एक अर्ज असे तीन अर्ज बाद झाले आहेत.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार