वृद्ध शिक्षिकेवर लज्जास्पद आरोप; महिला आयोगाकडे दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:52 AM2018-10-13T00:52:25+5:302018-10-13T00:52:36+5:30

तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता.

allegations of an elderly teacher; Women's Commission | वृद्ध शिक्षिकेवर लज्जास्पद आरोप; महिला आयोगाकडे दाद

वृद्ध शिक्षिकेवर लज्जास्पद आरोप; महिला आयोगाकडे दाद

Next

नालासोपारा : तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता. याबाबत शहानिशा न करता पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. या विरोधात राज्याचे गृहमंत्री, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य अल्पसंख्यांक आयोग व महिला आयोगाकडे दाद मागितली आहे.
नालासोपारा पूर्व येथील सेक्टर ९, कावेरी को. हो. सोसायटीत फिलोमीना फर्नांडिस (७८) या निवृत्त शिक्षिका राहतात. सोसायटीतील काही सदस्यांबरोबर त्यांचा वैयिक्तक वाद आहे. त्यांचा मुलगा परदेशी नोकरीनिमित्त असून, मुलीचे लग्न झालेले आहे. २७ सप्टेंबर रोजी फिलोमीना यांच्या घरी त्यांचे नातेवाईक पाहूणे म्हणून आले होते. यावेळी रात्री १२:३० वाजता सोसायटीतील काही पदाधिकारी सदस्य पोलिसांना सोबत घेत जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसून त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर न धाबता पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना रात्रीच्या वेळी महिला पोलीस नसतानाही तुळींज पोलीस ठाण्यात नेले होते. वयोमानानुसार धड चालू सुद्धा शकत नसलेल्या फिलोमीना यांना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. आपला गुन्हा काय तो तरी सांगा असे वारंवार सांगितल्यावर तुम्ही घरात वेश्याव्यवसाय करता असा गंभीर आरोप सोसायटीतील लोकांचा असल्याचे सांगताच त्यांना जबर धक्का बसला आहे.
वैयिक्तक आकसेपोटी सोसायटीत काहींनी या वयोवृद्ध महिलेची केलेली ही क्रुर चेष्टा असून याबाबत आपण अप्पर पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रार केल्याचे त्यानी सांगीतले. या निवेदनात वैयिक्तक आकसेपोटी सोसायटीतील दहा सदस्यांनी आपल्यावर गंभीर आरोप लावून आपली बदनामी केली असून २ पोलीस कर्मचाºयांनी त्यांना सहकार्य केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वसईतील ‘मी वसईकर’ अभियानाचे वसंत नगरी येथील कार्यकर्ते अ‍ॅड. सुमित डोंगरे व अ‍ॅड. अनिल चव्हाण, अ‍ॅड जॉर्ज फरगोस, रामदयाला निषाद, विनायक निकम, लोव्हजॉय डायस, निलेश वर्तक व शेकडो कार्यकर्ते यांनी समनवयक मिलिंद खानोलकर यांच्यासह त्या पीडित वृद्ध शिक्षिकेची घरी जाऊन भेट घेऊन त्यांना धीर दिला. अप्पर पोलिस अधीक्षक वसई यांची या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्या वृद्ध महिलेला न्याय देण्यात यावा व चौकशी करण्यात यावी अशी मागणी १ आॅक्टोबर रोजी केली होती. चौकशी करून आपणास कळवतो असे आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिले. परंतु १० दिवस उलटून गेले तरी प्रकरणाबाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप मी वसईकर संघटनेकडून करण्यात येत आहे.

Web Title: allegations of an elderly teacher; Women's Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.