विक्रमगडमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर
By Admin | Updated: October 30, 2016 02:25 IST2016-10-30T02:25:28+5:302016-10-30T02:25:28+5:30
विक्रमगड नगरपंचायतीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उरले असून १७ प्रभागांसाठी १०६ उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

विक्रमगडमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर
विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उरले असून १७ प्रभागांसाठी १०६ उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
या नगरपंचयतीच्या १७ प्रभागातील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा विक्रमगड नगरपंचायतीचा गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे़ ही नगरपंचायत काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्षही मोठया ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने यामध्ये प्रामुख्याने भाजप,राष्ट्रवादी-कॉग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे.
प्रत्येक उमेदवारांला ही निवडणुक म्हणजे प्रतिष्ठेचा विषय वाटत असून पक्षांनी तिकीट दिले नाही तर अपक्ष म्हणुन अर्ज भरले गेलेले आहेत़ ११ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याकरीता पक्षाकडून सक्ती करण्यांत येईल़ मात्र, अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याचा त्यांचा निर्णय अंतीम राहाणार असल्याचेही काही उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलतांना सांगीतले़
सर्वच राजकीय पक्षांकरीता ही निवडणुक महत्वाची व मोलाची ठरणारी आहे़ कारण या निवडणुकीमध्ये मिळणाऱ्या यशावरच पुढील पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकीची समिकरणे अवलंबुन राहाणार आहे़ नुकत्याच झालेल्या विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सरशी झाली होती. परंतु त्या खालोखाल शिवसेना तसेच कॉग्रेस व राष्ट्रवादी यांनीही चांगली कामगीरी केल्याचे आकडेवारीवरु न दिसून आले होते.
मोखाड्यात ६९ उमेदवार
मोखाडा : मोखाडा नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची अखेरची तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज सादर करताना तारांबळ उडाली होती. मोखाडाद्यातील नविनयुक्त नगरपंचयरीच्या १७ प्रभागांसाठी शिवसेना १७, भाजपा १६, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ९, बविआ २ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी याचे आघाडीचे संकेत स्पष्ट असून शिवसेना भाजपा युती होते किंवा नाही हे चित्र गुलदस्त्यात आहे.
तलासरीमध्ये ८१ अर्ज
तलासरी : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशीपर्यंत ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजप, माकप , राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज दाखल केले. ओबीसी उमेदवार धावाधाव करून भाजप , माकप व राष्ट्रवादी पक्षांनी मिळवून अर्ज दाखल केले तर शिवसेनेने ओबीसी उमेदवार विना दहा अर्ज दाखल केले.