मोहरमनिमित्त सर्वत्र मिरवणुका
By Admin | Updated: October 24, 2015 23:22 IST2015-10-24T23:22:18+5:302015-10-24T23:22:18+5:30
वसईतील मुस्लिम समाजाने आज मोहरमनिमित्त शहरी व ग्रामीण भागात मिरवणुका काढल्या. इमाम हुसेन हे करबलाच्या संघर्षात शहीद झाल्याच्या निमित्ताने मुस्लिम

मोहरमनिमित्त सर्वत्र मिरवणुका
वसई : वसईतील मुस्लिम समाजाने आज मोहरमनिमित्त शहरी व ग्रामीण भागात मिरवणुका काढल्या. इमाम हुसेन हे करबलाच्या संघर्षात शहीद झाल्याच्या निमित्ताने मुस्लिम समाज हा दिवस दुखवटा म्हणून पाळत असतो.
जिल्ह्याच्या अनेक भागांत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो. वसई, पापडी, नालासोपारा, वाजामोहल्ला, मनोर, चिंचणी, पालघर, शिरगाव या गावांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने विखुरला आहे. दरवर्षी मोहरमच्या दिवशी मिरवणुका काढण्यात येतात. (प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्याच्या चिंचणी-तारापूर गावात मोहरमनिमित्ताने शनिवारी काढण्यात येणाऱ्या ताजियाचे दर्शन घेण्यासाठी तसेच नवस (मन्नत) फेडण्यासाठी आज हिंदू-मुस्लिमांचा प्रचंड जनसमुदाय जमला होता. या वेळी सर्वत्र सरबत, फालुदा, मिठाई तसेच गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.