शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:02 AM

रिवेरा हॉस्पिटलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण : एप्रिलमध्ये ३४ मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असून त्याचा उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. सद्यस्थितीत रिवेरा सेंटरमधील अतिदक्षता (आयसीयू) बेड फुल झाले असून ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. या सेंटरमध्ये २५० कोरोना रुग्ण क्षमता असून २९४ रुग्ण सध्या तेथे दाखल आहेत, तर गेल्या १ एप्रिलपासून ३४ कोरोना रुग्णांचा या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.रिवेरा हाॅस्पिटल या कोरोनाबाधितांसाठी २५० क्षमता असलेल्या रुग्णालयात सध्या २९४ कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर अतिदक्षता बेडची संख्या ५० ची आहे, मात्र रुग्णसंख्या रोजच वाढत असल्याने येथील ऑक्सिजन बेड फुल झाले आहेत, अशी माहिती रिवेरा हॉस्पिटलचे नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत राजगुरू यांनी दिली.जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून येणाऱ्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे २५० रुग्ण क्षमता असलेल्या रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असून नर्स, डॉक्टर्स, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन, पॅरा मेडिकल स्टाफ यांची तातडीने संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.रिवेरा सेंटर हे येथील आठ तालुक्यांसाठी जिल्हा सेंटर आहे, मात्र या सेंटरमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग, अपुरी क्षमता व योग्य नियोजनाचा अभाव दिसत असल्याने रुग्णांची व नातेवाईकांची फरफट होत आहे. काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. उपलब्ध कर्मचारीवर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता काम करीत असले तरी त्यांच्यावर कामाचा अतिरक्त ताण पडत असल्याने तेही अपुरे पडत आहेत. जिल्हा रुग्णालय म्हणून शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तरी शासनाने या जिल्हा सेंटरकडे गांभीर्याने पाहून येथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १ तारखेपासून ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून अतिदक्षता बेड फुल झाले आहेत, तर २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- डॉ. प्रशांत राजगुरू, नोडल ऑफिसर, रिव्हेरा हॉस्पिटल