शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:14 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे.

- शशिकांत ठाकूर कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे. त्याला कायदा आणि नियम धाब्यावर बसविण्याची वृत्ती जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे एकदा वसई सोडले की, मार्गात कुठेही अग्निशमन यंत्रणा निर्माण न करण्याची बेफिकीरीही कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात ओव्हरलोड भरलेल्या गवताच्या भाºयांच्या संपर्कात वीजवाहक तारा आल्याने चार ट्रकला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी मोठी झाली. त्यापाठापाठ मंगळवारी हायड्रोजनच्या ट्रंकरला आग लागली. त्यात एकाचा जीव गेला तर तीन जखमी झाले. याला कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गवत अथवा माल भरणे, त्याची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त ठेवणे, लोंबणाºया विजवाहकतारा या ताणून न बांधणे ही कारणे जशी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे आपला पेट्रोलपंप अथवा हॉटेल याचा धंदा जोरात व्हावा यासाठी महामार्गाचा डिव्हायडर तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेणे.असे प्रकारही कारणीभूत आहेत. ज्या महामार्गावर वाहनांची गती ताशी शंभर कि.मी वा त्याच्या जवळपास असते त्यावर क्रॉसिंग शक्यतो नसावेत हा संकेत आहे. महामार्गा तसाच बांधला आहे. परंतु अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाºया वाहनावर धडकते हा नेहमीचा अनुभव आहे. अनेकदा असे तोडलेले डिव्हायडर पुन्हा पूर्ववत केले ते परत तोडले जातात . त्यामुळेही अपघात होतात. वसई सोडल्यानंतर ज्याच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे असे एकही दल नाही. जेथे त्या आहेत तेथील बंब येईपर्यंत तासन्तास निघून जातात. यावर तोडगा निघेपर्यंत हे अपघात सुरूच राहतील.>सुसज्ज दल आवश्यकडहाणूमधील वीजप्रकल्प आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक रसायनांची वाहतूक करणारे हजारो टँकर अशी स्थिती असतांना महामार्गालगत तळ असलेली आधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी सरकार सतत दुर्लक्षित आलेले आहे. ती तातडीने पूर्ण होण्याची असलेली आवश्यकता या अपघातामुळे मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी चर्चा स्थानिकात सुरू आहे.