भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला
By धीरज परब | Updated: July 18, 2023 21:51 IST2023-07-18T21:51:30+5:302023-07-18T21:51:30+5:30
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक यांनी भाईंदर पूर्वेला सोमया यांचा प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळला.

भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला
मीरारोड - अश्लील व्हिडीओ वरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा पुतळा भाईंदरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जाळण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक यांनी भाईंदर पूर्वेला सोमया यांचा प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटक व माजी गटनेत्या नीलम ढवण , उपजिल्हाप्रमुख हेमलता जोशी व कांचन लाड, उपशहर प्रमुख कल्पना शिगवण, चेतना महाले, विभाग संघटक रुचिता सावंत , उपशहर प्रमुख राजाराम सावंत व नाना धाडीवाल, विभाग संघटक वनिता महाडिक तसेच शिवसैनिकांनी भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर आंदोलन करत भाजपा आणि सोमय्या यांचा निषेध केला.
सोमय्या आणि त्यांचा भाजपा किती घाणेरड्या प्रवृत्तींचा घाणेरडे आहे हे आता देशातील जनतेला कळून चुकले आहे. या आधी एका भाजपा माजी आमदाराचा असाच अश्लील प्रकारचा व्हिडीओ जनतेने पाहिला आहे असे नीलम ढवण म्हणाल्या .
आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ कुठे आहेत? असा सवाल करत गृहमंत्री आणि सरकार काय कारवाई करतात हे देशातल्या जनतेला सुद्धा पहायचे आहे असे नीलम ढवण म्हणाल्या.