शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

श्रवणचा मृतदेह १३ दिवस पडूनच, निष्कळजीपणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:46 IST

बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही

शशी करपे वसई : बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर बालकामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली जाणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.१ जून २०१६ रोजी वालीव चिंचोटी येथील धातूच्या बांगड्यांवर नक्षीकाम करणाºया कारखान्यात बचपन बचाव आंदोलन आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने कारवाई करून १६ बालकामगारांची सुटका केली होती. त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. यातील श्रवणकुमारचा १६ आॅगस्ट २०१७ रोजी संशयास्पद मृत्यू झाला आहे.बालकामगारांची मुक्तता करण्यात आल्यानतर वालीव पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना कोणताही आजार अथवा बाधा नव्हती. त्यानंतर त्यांना उल्हासनगर येथील चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले होते. कमिटीने मुलांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली होती. याप्रकरणात पोलिसांनी रोहित चौधरी, पंकज चौधरी, पवन चौधरी, विक्रम चौधरी या मालकांविरोधात गु्न्हा दाखल केला होता.श्रवण हा पवन चौधरी यांच्याकडे कामाला होता. त्याची बालसुधारगृहातून मुक्तता करून पालकाच्या ताब्यात देण्यासाठी चौधरी तीन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी श्रवणच्या सुटकेसाठी तीस हजार रुपयांचे पोस्टल सेव्हिंग सर्टिफि केटही तयार केले होते. त्यानंतरही श्रवणचा ताबा मिळत नव्हता असा चौधरी यांचा दावा आहे. १२ आॅगस्टला पोटात दुखत असल्याने त्याला इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सुधारगृहात आणले होते. रात्री त्याची प्रकृती जास्तच खालावल्याने त्याला प्रथम ठाणे सिव्हील हॉस्पीटल आणि नंतर मुंबईतील केईएममध्ये नेण्यात आले होते. यावेळी श्रवणच्या पालकांना बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे श्रवणच्या रक्तासाठी दहा हजार रुपये आणि सोनोग्राफीसाठी एक हजार रुपये पवन चौधरी यांच्याकडून घेण्यात आले होते. मात्र, १६ आॅगस्टला उपचार सुरु असतानाच श्रवणचा मृत्यू झाला. बाल सुधारगृहाच्या निष्काळजीपणामुळे श्रवणचा बळी गेला आहे. त्याच्या पालकांनी तेरा दिवस उलटले तरी श्रवणचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. बाल सुधारगृह आणि चाईल्ड वेल्फेअर याप्रकरणी दोषी असून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी श्रवणचे वडिल दिलीप राय यांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस