शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश द्या, आमदाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:06 IST

आमदारांची मागणी : शेकडो विद्यार्थी प्रशासकीय गलथानपणामुळे वंचित

डहाणू : प्रकल्प अधिकारी आणि प्रांत अधिकारी नसल्यामुळे शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले अद्यापही न मिळाल्याने त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नसून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते आहे. ते वाचविण्यासाठी त्यांना विशेष बाब म्हणून तातडीने वसतीगृहात प्रवेश द्यावा अशी मागणी आमदार अमित घोडा व आनंद ठाकूर यांनी केली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत जिल्हाभरात सुरू असलेल्या निवासी शासकीय वस्तीगृहात कासा सायवन कासेसरी, भवाडी, निंबापूर, गांगुडा या भागातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या अनेक महिन्यापासून वस्तीगहात प्रवेश मिळाला नसल्याने त्या विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करण्याची वेळ आली असून कासा येथील मुलांच्या वस्तीगृहात भरपूर जागा उपलब्ध असूनही प्रकल्प कार्यालयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने वरील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना त्वरित आॅफलाईन प्रवेश देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंदभाई ठाकूर, शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी आदिवासी अप्पर आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.डहाणू आदिवासी विकास प्रकल्प संचालित पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथे १७ निवासी वस्तीगृह असून येथे शहरी भागात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलामुलींना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

दरम्यान नुकतीच प्रांत अधिकारी म्हणून सौरभ कटियार हजर झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखल मिळण्यास सुरू झाले. परंतु निवासी शासकीय वस्तीगृहाचा प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याने वस्तीगृह प्रवेशाचे मार्ग बंद झाले आहे. यावर तोडगा काढा अशी आमदारांची मागणी आहे. त्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.सन २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षासाठी या वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु डहाणू प्रकल्प कार्यालय तसेच प्रांत कार्यालयात गेल्या सहा महिन्यापासून स्वतंत्र अधिकारी नसल्याने शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला मिळू शकला नाही. परिणामी निवासी शासकीय वस्तीगृहापासून विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. असंख्य पालक तसेच शैक्षणिक संस्थंनी ही बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ही मागणी केली. 

टॅग्स :MLAआमदारTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाStudentविद्यार्थी