शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

तुंगारेश्वर आश्रमावर कारवाई, रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:57 PM

कारवाईसाठी तुंगारेश्वर पर्वतावर दाखल झालेल्या फौजफाट्याने पर्वतावर संचारबंदी लागू केल्याने भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

पारोळ : सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार बालयोगी सदानंद महाराज यांच्या तुंगारेश्वर पर्वतावरील आश्रमावर २ हजार पोलीस बंदोबस्त घेऊन आश्रमाच्या इमारती वर गुरु वारी तोडक कारवाई केल्याने भक्तांनी संताप व्यक्त करून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा, सातीवली या ठिकाणी रास्ता रोको करत खानिवडे येथे महामार्गावर टायर जाळले.

मंगळवारपासून कारवाईसाठी तुंगारेश्वर पर्वतावर दाखल झालेल्या फौजफाट्याने पर्वतावर संचारबंदी लागू केल्याने भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. २ हजार पोलिसांचा फौजफाटा वाढवून त्यात बुधवारी आणखी दोन हजारांची कुमक वाढवण्यात आली. बुधवारी आश्रमावर कारवाई होईल.असे असताना गुरुवारी कारवाई ला सुरु वात करून या आश्रमाचा भक्त निवास तोडला. पर्यावरणवादी देबी गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तुंगारेश्वर आश्रम जमिनदोस्त करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानंतर कारवाई सुरू झाली तरीही भजन कीर्तन व चक्र ी उपोषण भक्तांनी चालू ठेवले पण प्रशासनाने ही कारवाई केल्याने भक्तांमध्ये संताप होता. याबाबत लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून होते.

बजरंग दलाचा रास्ता रोकोमनोर : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तुंगारेश्वर येथे सदानंद महाराज यांचा आश्रम तोडण्याच्या विरोधात आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला त्यांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे १९७२ पासून वसई तालुक्यात सतीवली गावाच्या हद्दीत असलेल्या उंच डोंगरावर सदानंद महाराज यांची आश्रम आहे त्यास तृणगसवरच्या नावाने ओळखले जाते मात्र हा आश्रम वन जमिनीत असल्याचे ते आश्रमची इमारत तोडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. तेव्हापासून पालघर जिल्ह्यात संवेदनशील बंदोबस्त असून त्यांचे भाविकांनी संतप्त व्यक्त करीत त्याच्या विरोधात आज मुंबई -अहमदाबाद महामार्गावर सुशील सहा जिल्हा मंत्री ,चंदन सिंग जिल्हा संयोजक व मुकेश दुबे बजरंग दल पदाधिकारी यांच्या नेतृत्व खाली कार्यकर्त्यांनी पोलिसांना अंधारात ठेऊन वाडे खडकोना गावचे हद्दीत रस्ता रोको केला. सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बजरंग दलाचे सुशील सहा, चंदन सिंग, नितीन भोई, मुकेश दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.