तुंगारेश्वर आश्रमावर कारवाई, रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:57 PM2019-08-29T23:57:03+5:302019-08-29T23:57:30+5:30

कारवाईसाठी तुंगारेश्वर पर्वतावर दाखल झालेल्या फौजफाट्याने पर्वतावर संचारबंदी लागू केल्याने भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Action on Tungareshwar Ashram, stop the road | तुंगारेश्वर आश्रमावर कारवाई, रास्ता रोको

तुंगारेश्वर आश्रमावर कारवाई, रास्ता रोको

googlenewsNext

पारोळ : सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार बालयोगी सदानंद महाराज यांच्या तुंगारेश्वर पर्वतावरील आश्रमावर २ हजार पोलीस बंदोबस्त घेऊन आश्रमाच्या इमारती वर गुरु वारी तोडक कारवाई केल्याने भक्तांनी संताप व्यक्त करून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा, सातीवली या ठिकाणी रास्ता रोको करत खानिवडे येथे महामार्गावर टायर जाळले.


मंगळवारपासून कारवाईसाठी तुंगारेश्वर पर्वतावर दाखल झालेल्या फौजफाट्याने पर्वतावर संचारबंदी लागू केल्याने भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. २ हजार पोलिसांचा फौजफाटा वाढवून त्यात बुधवारी आणखी दोन हजारांची कुमक वाढवण्यात आली. बुधवारी आश्रमावर कारवाई होईल.असे असताना गुरुवारी कारवाई ला सुरु वात करून या आश्रमाचा भक्त निवास तोडला. पर्यावरणवादी देबी गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तुंगारेश्वर आश्रम जमिनदोस्त करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानंतर कारवाई सुरू झाली तरीही भजन कीर्तन व चक्र ी उपोषण भक्तांनी चालू ठेवले पण प्रशासनाने ही कारवाई केल्याने भक्तांमध्ये संताप होता. याबाबत लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून होते.


बजरंग दलाचा रास्ता रोको
मनोर : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तुंगारेश्वर येथे सदानंद महाराज यांचा आश्रम तोडण्याच्या विरोधात आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला त्यांना मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे १९७२ पासून वसई तालुक्यात सतीवली गावाच्या हद्दीत असलेल्या उंच डोंगरावर सदानंद महाराज यांची आश्रम आहे त्यास तृणगसवरच्या नावाने ओळखले जाते मात्र हा आश्रम वन जमिनीत असल्याचे ते आश्रमची इमारत तोडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. तेव्हापासून पालघर जिल्ह्यात संवेदनशील बंदोबस्त असून त्यांचे भाविकांनी संतप्त व्यक्त करीत त्याच्या विरोधात आज मुंबई -अहमदाबाद महामार्गावर सुशील सहा जिल्हा मंत्री ,चंदन सिंग जिल्हा संयोजक व मुकेश दुबे बजरंग दल पदाधिकारी यांच्या नेतृत्व खाली कार्यकर्त्यांनी पोलिसांना अंधारात ठेऊन वाडे खडकोना गावचे हद्दीत रस्ता रोको केला. सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बजरंग दलाचे सुशील सहा, चंदन सिंग, नितीन भोई, मुकेश दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Web Title: Action on Tungareshwar Ashram, stop the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.