मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

By धीरज परब | Updated: July 3, 2024 19:37 IST2024-07-03T19:37:12+5:302024-07-03T19:37:41+5:30

मीरा भाईंदर महापालिकेने ३ जुलै रोजी २ बारच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली.

Action on 2 more bars in Mira Road  | मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने ३ जुलै रोजी २ बारच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. मीरा भाईंदर महापालिकेत आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशाने ऑर्केस्ट्रा बार, बार, लॉज, पान टपऱ्या आदींच्या अनधिकृत बांधकामांवर ६ व्य दिवशी देखील कारवाई केली गेली. प्रभाग समिती ६ च्या अखत्यारीत आलेल्या घोडबंदर मार्गावरील चेणे येथील हिल व्ह्यू ह्या बार आणि रेस्टोरेंटचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तसेच मीरा ह्या बर्चयें अनधिकृत बांधकाम देखील तोडण्यात आले आहे. 

सदर कारवाई वेळी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रवि पवार, सहाय्यक आयुक्त प्रभाकर म्हात्रे, प्रियांका भोसले, काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार पाटील सह पालिकेचे कनिष्ठ अभियंता व महाराष्ट्र सुरक्षा बल सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई  करण्यात आली. 

Web Title: Action on 2 more bars in Mira Road