पर्यावरणाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई
By Admin | Updated: April 20, 2017 03:57 IST2017-04-20T03:57:36+5:302017-04-20T03:57:36+5:30
तारापुर एमआयडीसीमधील उद्योगा मधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक करवाई करण्यात येईल

पर्यावरणाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई
पंकज राऊत, बोईसर
तारापुर एमआयडीसीमधील उद्योगा मधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक करवाई करण्यात येईल असे संकेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तारापुरच्या उद्योजकाच्या आणि त्यांच्या प्रतिनिधिनच्या आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आले.
तारापुर एमआयडीसीमधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीला तारापुर इंडस्ट्रियल
म्यान्यूफ्याकचर असोसिएशन (टीमा), तारापुर एन्वॉयरमेंट प्रोटेक्शन सोसायटी ( टी. ई. पी. एस.) चे पदाधिकारी उद्योजक व त्यांचे प्रतिनिधि आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील चर्चे संदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली असली तरी मिळालेल्या माहिती नुसार या बैठकीत राष्ट्रीय हरीत लावादा च्या निर्देशा बाबत मार्गदर्शन करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडलाचे पर्यवरणा संदर्भांतिल नियमांचे काटेकोरपणे पालन करून गंभीर पणे दक्षता घ्या प्रदूषण नियंत्रणत ठेवण्या करीता नवीन आणि वेगवेगळ्या टेक्नोलॉजी चा वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे.