ग्रामसेवक कोरडेंवर कारवाई
By Admin | Updated: November 9, 2016 03:34 IST2016-11-09T03:34:11+5:302016-11-09T03:34:11+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जव्हार तालुक्यातील ४२ मजुरांनी कामाची मागणी करूनही चांभारशेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जगदीश कोरडे यांनी काम उपलब्ध

ग्रामसेवक कोरडेंवर कारवाई
हितेन नाईक, पालघर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जव्हार तालुक्यातील ४२ मजुरांनी कामाची मागणी करूनही चांभारशेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जगदीश कोरडे यांनी काम उपलब्ध करू न दिल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यात मागेल तिथे रोजगार निर्माण करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथील ४२ मजुरांनी तत्कालीन ग्रामसेवक जगदीश कोरडे यांच्याकडे कामाची मागणी करूनही त्यांना काम उपलब्ध करून देण्यात संबंधित ग्रामसेवकानी चालढकल केली होती. परिणामी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागला होता. कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आणि जव्हारच्या तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर लोबो यांनी घेतलेले आक्षेपाचे मुद्दे, मजुरांचा जबाब, ग्रामसेवक, पालक तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक यांचे स्पष्टीकरण मागविले होते. त्या नुसार मजुरांनी काम मागितल्याच्या आदल्या दिवशी त्यांना नमुना क्र ं.७ पुरविणे गरजेचे असतांना तो उशिरा पुरवणे, कामाची आउटलाईन वेळेवर आखून न देणे, मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर पंचायत समिती मार्फत आॅनलाईन काम देऊ केले होते. त्या प्रमाणे घटनास्थळी मजूर कामावर गेलेही परंतु ग्रामसेवकाच्या वैयक्तिक चुकीमुळे ते स्वत: त्या ठिकाणी उपस्थित राहू न शकल्याचा जबाब मजुरांनी नोंदविला त्यामुळेच सकाळी काम (रोजगार) उपलब्ध होऊ शकला नाही, ज्या ठिकाणी काम सुरु करणे अपेक्षित होते त्यांची कुठलीही परवानगी ग्रामसेवकाने घेतली नव्हती. असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला.