फटाके विक्रेत्यांवर धडक कारवाई

By Admin | Updated: October 27, 2016 03:36 IST2016-10-27T03:36:31+5:302016-10-27T03:36:31+5:30

वसई विरार पालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर खुलेआम फटाके विकणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई सुरु केली आहे. बुधवारी शहरातील अनेक भागात रस्त्यांवर विकले

Action on firecrackers | फटाके विक्रेत्यांवर धडक कारवाई

फटाके विक्रेत्यांवर धडक कारवाई

वसई : वसई विरार पालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर खुलेआम फटाके विकणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई सुरु केली आहे. बुधवारी शहरातील अनेक भागात रस्त्यांवर विकले जाणारे फटाके जप्त करण्यात आले.
पालिकेने रस्त्यावर आणि गजबजलेल्या ठिकाणी उघड्यावर फटाके विकणस बंदी घातली आहे. एकतर दुकानात अथवा पालिकेने ठरवून दिलेल मोकळ जागेत फटाके विकण्यास परवानगी दिली जात आहे. त्यासाठी संंबंधित विभागाचा ना हरकत परवाना आणल्यानंतर पालिकेकडून फटाके विकण्याची परवानगी देण्यात येते. ंयदा पालिकेने उघड्यावर फटाके विकणाऱ्यांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. बुधवारी सकाळपासून पालिकेच्या पथकाने ठिकठिकाणी छापे मारून फटाके विकणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाई लाखो रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुुरुच ठेवली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.