शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

अखेर वादग्रस्त ब्रेथ केअर हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा; नोंदणी होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:58 IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आदेश

- आशिष राणेवसई : आनंदनगर येथील गिरीविहार सोसायटी संकुलात नर्सिंग व मॅटर्निटी होम नोंदणीच्या नावाखाली अवैधपणे संसर्गजन्य (क्षयरोग) हॉस्पिटल चालवून रुग्णांची लूट करणाऱ्या ‘ब्रेथ केअर हॉस्पिटल’ या डॉ. धर्मेंद्र दुबे संचलित हॉस्पिटलवर वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानंतर या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे. वसई-विरार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपाच्या प्र-वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी ‘लोकमत’ला दिली. तक्रारदार नितांत राऊत यांनी माहिती दिल्यानुसार, वसई रोडस्थित गिरीविहार सोसायटी या निवासी संकुलातील जागेत डॉ. योगेंद्र रवी यांच्यानावे नोंदणी केलेले ब्रेथ केअर हॉस्पिटल हे संसर्गजन्य श्वसन व क्षयरोगावर उपचार करणारे हॉस्पिटल भाडेकरारावर श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय व इतर आवश्यक परवानगीशिवाय चालू केले होते. या हॉस्पिटलमध्ये श्वसनरोगासंबंधित गंभीर संसर्गजन्य आजाराचे रुग्णही दाखल करून घेतले जात होते. यामुळे सोसायटी तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.या हॉस्पिटलसंदर्भात गिरीविहार सोसायटीने वारंवार आक्षेप घेऊनही  हे हॉस्पिटल बंद न करता उलट सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवरच वारंवार खोटे आरोप करण्याचा प्रयत्न  करून, पालिकेच्या काही अधिकाऱ्य़ांना हाताशी धरून हे अवैध हॉस्पिटल आजतागायत सुरूच ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर कोविड काळातही पालिकेच्या परवानगीशिवाय हे हॉस्पिटल अविरत सुरूच होते. मात्र सोसायटी पदाधिकाऱ्यांनी आपला पाठपुरावा राज्य सरकारदरबारी सुरूच ठेवला होता. अखेर उशिरा का होईना, या पाठपुराव्यास शेवटी यश आले आणि हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली. वादग्रस्त मुख्य अग्निशमन दल अधिकारी दिलीप पालव यांची भूमिका या रुग्णालयप्रकरणी संशयास्पद आहे. डॉ. धर्मेंद्र दुबे व  पालिकेच्या अग्निसुरक्षेसंबंधात कोणतेही निकष न पाळताही अग्निसुरक्षा प्रमाणपत्र दिले गेले. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.- नितांत राऊत, तक्रारदार, सचिव, गिरीविहार गृहनिर्माण संस्था, वसई वसईतील ब्रेथ केअर हॉस्पिटलबाबतच्या तक्रारीसंदर्भात आयुक्तांना कारवाईसाठी सांगण्यात आले आहे. अजूनही कारवाई झाली नसेल, तर लागलीच मी स्वतः माहिती घेतो. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य