वसईत होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी २९८ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:42 IST2018-03-04T02:42:02+5:302018-03-04T02:42:02+5:30
होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी पोलिसांनी वसईत २९८ वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी १२५ वाहने ताब्यात घेऊन अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला.

वसईत होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी २९८ वाहनचालकांवर कारवाई
वसई : होळी आणि धूलीवंदनाच्या दिवशी पोलिसांनी वसईत २९८ वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी १२५ वाहने ताब्यात घेऊन अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला.
कळंब, अर्नाळा, राजोडी, भुईगाव यासह वसईतील समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. यामध्ये अनेक तरुण-तरुणी दारु पिऊन सुसाट आणि बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होऊन प्रसंगी हाणामारीचे प्रसंगही घडतात. हे लक्षात घेऊन वसईत पोलिसांनी दोन दिवस कडक बंदोबस्त ठेवला होता.
वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संतोष भुवन नाका, साईनाथ नाका, बोळींज, सिव्हिक सेंटर, तुळींज नाका, ओलांडा नाका, कळंब नाका, भुईगाव चेकपोस्ट या मुख्य नाक्यांवर पथके नेमली होती. यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, धूम स्टाईलने वाहन चालवणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत १०० मद्यपी वाहनचालक, १५० ट्रीपल सीट इतर मिळून २९८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई केली. कारवाईत १२५ वाहने ताब्यात घेण्यात आली. तर कारवाईत अडीच लाखाचा दंडही वसूल करण्यात आला. दरम्यान, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी नेहमीच कारवाईची मागणी होत आहे.