कल्याण समितीकडून मोखाड्याचा लेखाजोखा

By Admin | Updated: April 22, 2017 02:09 IST2017-04-22T02:09:00+5:302017-04-22T02:09:00+5:30

पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या समस्या व झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा याची माहिती शासन दरबारी पाठवण्यासाठी या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गुरुवारी

Account of the welfare committee | कल्याण समितीकडून मोखाड्याचा लेखाजोखा

कल्याण समितीकडून मोखाड्याचा लेखाजोखा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या समस्या व झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा याची माहिती शासन दरबारी पाठवण्यासाठी या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गुरुवारी मोखाडा दौरा पार पडला. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश निकम यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या शासनस्तरावर पाठवून त्या पुर्ण केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
यानंतर पंचायत समितीच्या हॉलमध्ये तालुकास्तरीय समस्यांचा आढावा घेत जुलै ते आॅगस्ट महिन्यामध्ये कुपोषणामुळे प्रकाशात आलेल्या कळमवाडी गावातील कुपोषणाचा बळी ठरलेल्या सागर वाघ याच्या घरी भेट देण्यात आली. त्याच्या आईवडीलांची चौकशी केल्यानंतर पळसुंडा आश्रमशाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कल्याण समितीने डोल्हारा पाझर तलावाची पाहणी केल्यानंतर जव्हार तालुक्या कडे मार्गक्र मण केले.
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या मोखाडा दौर्यात समिती अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार वैभव पिचड, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार निरंजन डावखरे हे सदस्य होते. समितीसोबत पालघर जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टि. आ.े चव्हाण, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, राजेश कंकाळ प्रांत स्विप्नल कापडणीस, प्रकल्प अधिकारी पविनक कौर उपस्थित होते. (वार्ताहर)

डहाणूतील समस्यांचा समितीकडून आढावा
डहाणू : येथील कुटीर
रु ग्णालय, आदिवासी विकास विभाग संचालित आदिवासी विकास प्रकल्पातील आंबेमोरा रस्ता, आश्रमशळा,वसतीगृह, डहाणू येथे बांधण्यात आलेले २० खाटांची व्यवस्था असलेले ट्राँमा सेंटर, चिखला बोर्डी येथे विकासकामांची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी भेटी दिल्या .
शुक्र वारी दुपारी ३ वाजता रिलायन्स हॉल येथे आढावा बैठक संपन्न झाली. यात आदिवासी आश्रमशाळा, वस्तीगृह, राबविण्यात आलेल्या योजनांच्या ठिकाणी दिलेल्या भेटीच्यावेळी आढळलेल्या त्रुटीं संदर्भात कार्यवाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, महानगरपालिका कार्यालय, सर्व नगरपालिका यांचाही आढाव घेण्यात आला.

Web Title: Account of the welfare committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.