According to the lottery, the woman chose fraud, 2.88 lakhs | लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची फसवणूक, २.८८ लाखांना चुना
लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची फसवणूक, २.८८ लाखांना चुना

नालासोपारा : विरार पूर्वेकडील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या लता शिवाजी कोळंबकर (३०) या महिलेला लॉटरी लागल्याने बक्षीस म्हणून लॅपटॉप देतो असे सांगून लाखो रुपयांचा चूना लावल्याची घटना घडली आहे. महिलेने रविवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बोगस कंपनी आणि ६ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
विरार पूर्वेकडील सहकार नगर परिसरातील श्रद्धा अपार्टमेंट मध्ये राहणाºया लता यांना एका मोबाईल नंबर वरून फोन आला की तुम्हाला लॉटरी लागल्याने बक्षीस म्हणून लॅपटॉप देणार आहे. अनेक लोकांनी त्यांना लॅपटॉपचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. कुरियरने लॅपटॉप घरी पाठवला जाणार असून उशीर झाल्याने तुम्हाला कंपनी अतिरिक्त ७ लाख रु पये देणार आहे त्या बदल्यात आॅनलाइन नंबरवर काही रुपये तुम्हाला कंपनीला पाठवावे लागणार.
यावर लता यांनी २ लाख ८८ हजार ९७६ रुपये आॅनलाईन पाठवून दिले पण बरेच दिवस झाले बक्षिस पण आले नाही व पैसे पण परत केले गेले नाही यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विरार पोलीस ठाण्यात जाऊन बोगस कंपनी आर बी इंडिया आणि वारंवार फोन करणारे अनुराधा, मिरा राठोड, अविनाश, राहुल व कंपनी मालक श्रीकांत वशिष्ठ, एम बी प्रसाद यांच्याविरोधात तक्र ार दिली आहे.


Web Title: According to the lottery, the woman chose fraud, 2.88 lakhs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.