मुंबई - अहमदाबाद मार्गावर अपघात; पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 04:44 IST2020-06-27T04:44:48+5:302020-06-27T04:44:53+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचारीच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात शुक्रवारी सायंकाळी चार जणांचा जागीच, तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मुंबईहून गुजरातमध्ये सूरतला ही कार जात होते.

Accident on Mumbai-Ahmedabad road; Five people died | मुंबई - अहमदाबाद मार्गावर अपघात; पाच जणांचा मृत्यू

मुंबई - अहमदाबाद मार्गावर अपघात; पाच जणांचा मृत्यू

तलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचारीच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात शुक्रवारी सायंकाळी चार जणांचा जागीच, तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मुंबईहून गुजरातमध्ये सूरतला ही कार जात होते.
दापचरी हद्दीत रबर बोर्डाजवळ भरधाव वेगात आलेल्या या कारवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजक तोडून मुंबईच्या वाहिनीवर घुसली आणि दोन-तीन वेळा उलटली. या कारमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५० ते ५५ वयोगटातील दोन पुरु ष, ३० ते ३५ वयोगटातील दोन महिला आणि १० ते १२ वर्षांचा एक मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख अद्याप पटू शकली नसून सर्व मृतदेह तलासरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. हे सर्व जण सूरतला जात असावेत, असा अंदाज पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून व्यक्त केला आहे.

Web Title: Accident on Mumbai-Ahmedabad road; Five people died