कृषी अधिकारी राजेश संखे यांच्या गाडीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:19 IST2019-12-29T23:19:37+5:302019-12-29T23:19:40+5:30

समोरासमोर दिली धडक : दोन जखमी

Accident on Agriculture Officer Rajesh Sankhe's vehicle | कृषी अधिकारी राजेश संखे यांच्या गाडीला अपघात

कृषी अधिकारी राजेश संखे यांच्या गाडीला अपघात

सफाळे : सफाळे वरई नाक्यादरम्यानच्या पूर्व बाजूस तांदूळवाडी नाक्याच्या पुढे नांगरवाडी चढ-उतारावर दोन कारची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही कारचे चालक किरकोळ जखमी झाले असून दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्याचे कृषी अधिकारी राजेश संखे हे आपली कार घेऊन सफाळ्याहून पारगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या कारशी त्यांच्या गाडीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही चालक जखमी झाल्याने स्थानिकांनी त्या जखमींना सफाळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Accident on Agriculture Officer Rajesh Sankhe's vehicle