अनधिकृत शाळांना मान्यता द्या - मोते
By Admin | Updated: April 5, 2016 01:10 IST2016-04-05T01:10:13+5:302016-04-05T01:10:13+5:30
पालघर जिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळा बंद केल्यास शाळाबाह्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढेल त्याकरीता त्या शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षणमंत्र्यांशी

अनधिकृत शाळांना मान्यता द्या - मोते
बोईसर : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळा बंद केल्यास शाळाबाह्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढेल त्याकरीता त्या शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिक्षक आमदार रामनाथ (दादा) मोते यांनी बावीस शाळांच्या संस्थाचालकांसोबत घेतलेल्या बैठकीत दिले.
शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश देऊन एक लाख रू. दंड व शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रू. दंडाची शिक्षा दिली होती. या धर्तीवर आमदार मोते यांनी परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून या शाळांनी मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले आहेत असे शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती.
संस्था चालकांच्या बैठकीत आमदार मोते यांनी मी खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगितले. तर पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी हा लढा म्हणजे ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणापसून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून संस्थाचालकांच्या बरोबर आ. मोते असल्याने या लढ्याला नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
या बैठकीस जी. के. पष्टे, संकपाळ सर, संतोष पावडे, चौधरी सर, शेख सर, यांच्यासह बावीस शाळांचे संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी समन्वयकाची भुमीका मुख्याध्यापक सुशिल शेजुळ यांनी पार पाडली.