शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:04 IST

यावेळच्या अर्थसंकल्पात ३३२ कोटींची वाढ.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई विरार महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ३ हजार ११२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त, प्रशासक अनिलकुमार पवार यांनी सोमवारी दुपारी सादर केला. या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत ३३२ कोटींनी वाढ करण्यात आली आहे. मालमत्ता आणि पाणीपट्टी करवाढ न करता उत्पनाचे मार्ग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यावर्षी नागरिकांना दिलासा देत कुठल्याही प्रकराची करवाढ लादण्यात आलेली नाही. 

जून २०२० ला महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत. परिणामी महापालिकेचा चौथा प्रशासकीय अंदाजपत्रक लोकप्रतिनिधींच्या शिवाय पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी प्रशासक असलेल्या आयुक्तांकडे सादर केले. प्रशासकाकडून या अंदाजपत्रकातील तरतुदींवर चर्चा केल्यानंतर त्याला अंतिम मंजूरी दिली जाणार आहे. यावेळी मुख्य लेखाअधिकारी सुरेश बनसोडे, उपायुक्त किशोर गवस, अजित मुठे, नानासाहेब कामठे, चारूशिला पंडित, समीर भूमकर, तानाजी नरळे, पंकज पाटील, नयना ससाणे, शहर अभियंता प्रदीप पाचंगे, प्रकाश साटम, पाणी अभियंता सुरेंद्र ठाकरे, कार्यकारी अभियंता अमोल जाधव हजर होते. 

आस्थापना खर्च, नगररचना, पथदिप व विद्युत व्यवस्था, अग्निशमन, शहर स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालयीन सेवा (वैद्यकिय आरोग्य), दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, परिवहन सेवा, बांधकाम, वृक्ष आणि पर्यावरण, उद्यान, तलाव सुशोभिकरण, जलतरण तलाव, क्रिडा व क्रिडा विषयक कार्यक्रम, नालेखोदाई पुरप्रतिबंधक कामे, पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. 

वरील सर्व सुविधा पुरवण्यासाठी यंदाही पालिकेने मालमत्ता करातून ३८४ कोटी ५७ लाख, नगररचना करातून २१० कोटी २० लाख आणि पाणीपुरवठा करातून १२० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. अनुदान जाहिरात कर ६ कोटी ५ लाख, अग्निशमन सेवा कर ३९ कोटी ७७ लाख आणि स्वच्छता सेवा ४६ कोटी ९५ लाख या उत्पन्नाचीही त्यात भर पडणार आहे. तसेच मुद्रांक शुल्क अनुदान, रस्ते दुरुस्तीसाठी व वाचनालय अनुदान १०० कोटी ५९ लाख, कर पे अँड पार्क वाहनतळ व्यवस्था, नो पार्किंग वाहने उचलणे, अतिक्रमण हटविणे, अनधिकृत बांधकामे तोडणे, प्रशासकीय शुल्क, जुन्या भंगाराच्या विक्रीचे जमा, निविदा फार्म फी व इतर नगरपालिका प्रकाशनाचे जमा, रुग्णालय व इतर आस्थापनाच्या नोंदणीसाठी नाहरकत दाखला व दाखला नूतनीकरण फी, जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंदणी फी इत्यादी बाबींपासून ६१ कोटी १० लाख रुपये इतके जमा अपेक्षित आहे.

१५ वा वित्त आयोगा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, एअर क्वालिटी या करीता अनुदान, त्याचं प्रमाणे अमृत पाणी पुरवठा योजना, स्थिानिक विकास कार्यक्रम (आमदार निधी), दलित वस्ती अनुदाने या अशा विविध स्वरुपात अनुदाना पोटी महानगरपालिकेस ४१३ कोटी ९९ लाख रुपये तर तर वस्तु व सेवा कर अनुदानापोटी ४८४ कोटी ७० लाख जमा होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराMuncipal Corporationनगर पालिका