शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील पोर्तुगीजकालीन किल्ल्यानजिक ट्रान्सफॉर्मर जळाला; युवकांच्या सतर्कतेने किल्याचे नुकसान टळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 07:13 IST

मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली असती, तर किल्ल्याचे  तसेच परिसरातील रहिवासी भागाचे मोठे नुकसान झाले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

डहाणू गाव येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याच्या दर्शनी भागात असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये सोमवार, 1जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या  सुमारास स्फोट होऊन आग लागली.  स्थानिक युवकांनी तत्काळ घटनेची माहिती माजी नगरसेविकेला दिल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने दोन बंबांना रात्री साडेबाराच्या सुमारास आग विझवण्यात यश आले. मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली असती, तर किल्ल्याचे  तसेच परिसरातील रहिवासी भागाचे मोठे नुकसान झाले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.    रात्री किल्ल्या परिसरात काही युवक बसले असताना ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट होऊन आग लागली. त्यांनी माजी नगरसेविका कीर्ती मेहता यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर कीर्ती यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कळवल्याने वीज खंडीत करण्यात आली. त्यानंतर अदानी थर्मल पॉवर स्टेशन तसेच डहाणू नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी उपाययोजना केल्यानंतर साडेबाराच्या सुमारास आग नियंत्रणात आली. परिसरातील वीज  पुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.  दरम्यान ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्यावर किल्ल्या लगतच्या झाडाच्या फांद्या आणिमुळांनी पेट घेतला होता. किल्ला परिसरात शासकीय कार्यालय, छोटी हॉटेल्स आणि रहिवासी भाग असल्याने मध्यरात्री आगीची घटना घडली असती तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती अशी माहिती  कीर्ती मेहता यांनी देत,  तरुणांनी राखलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. घटनास्थळी माजी नगरसेवक राजू माच्छी, डहाणू पोलीस, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :fireआगFortगडFire Brigadeअग्निशमन दल