शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून एकाला स्थानिकांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:51 IST

लहान मुले चोरण्यासाठी आल्या असल्याचे समजून एका व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केली. 

मंगेश कराळे

नालासोपारा : लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून नालासोपाऱ्याच्या संतोष भवन परिसरात रविवारी संध्याकाळी एकाला स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी त्या व्यक्तीला गर्दीतून सुखरूप वाचवून व बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

वसईमध्ये मुलं चोरीच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडीयावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाले आहे, त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेत बघत आहे. गौराईपाडा परिसरात एक व्यक्ती दारूच्या नशेत फिरत असताना रविवारी संध्याकाळी दिसला. तेव्हा स्थानिक लोकांना वाटले की तो मूल चोरण्यासाठी आला आहे.  त्यानंतर संतप्त जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच शेकडो लोक तिथे जमा झाले. 

पेल्हार पोलिसांनी त्या व्यक्तीला गर्दीतून वाचवून खासगी रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून बालक चोरीच्या अफवा वेगाने पसरत आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानंतरही मुले चोरीच्या अफवा लोकांमध्ये पसरत आहेत. विरार पश्चिममध्येही अशाप्रकारे बालक चोरीच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. तर वास्तव काही वेगळेच होते. मुले चोरीच्या घटना केवळ अफवा असून या अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस