शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यात रील्ससाठी आग, तरुणावर गुन्हा; पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीवरून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 08:59 IST

वसई किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्चमध्ये हासीम शेख या तरुणाने इन्स्टाग्राम रिल्ससाठी तेथील शिलालेखावर ‘एस’ आकारात ज्वलनशील रसायन टाकून आग लावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा/पारोळ : वसई भुईकोट किल्ल्यातील येणाऱ्या काही उत्साही पर्यटक तरुणांकडून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच शिलालेखावर आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्ला संवर्धनप्रेमींनी केला. याबाबत  पुरातत्त्व विभागाकडून आरोपी तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्चमध्ये हासीम शेख या तरुणाने इन्स्टाग्राम रिल्ससाठी तेथील शिलालेखावर ‘एस’ आकारात ज्वलनशील रसायन टाकून आग लावली होती. शेखने याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरून व्हायरल केला होता. याची गंभीर दखल घेत, इतिहास अभ्यासक, तसेच किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्त्व विभागाकडे ईमेलद्वारे तत्काळ तक्रार केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी कैलास नामदेवराव शिंदे यांनी वसई पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, किल्ल्यात इतिहासकालीन शिलालेख, चर्च,  तुरुंग, त्या काळातील पोर्तुगीजांचे कार्यालय तसेच अन्य ऐतिहासिक गोष्टी किल्ल्यात आजही पाहावयास मिळतात. 

सुरक्षारक्षक पैसे घेऊन देत होता परवानगीवसई किल्ल्यात घडलेल्या एका रिल्स प्रकरणात गडप्रेमी तसेच इतिहास अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच किल्ल्यात होणाऱ्या प्री-वेडिंंग शूटिंग व रिल्स बनवण्यासाठी किल्ल्यातील सुरक्षारक्षकच पैसे घेऊन संबंधिताना संमती देत असल्याचा आरोप स्थानिक व गडप्रेमी नागरिकांनी केला आहे. याबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे वसईसारख्या ऐतिहासिक किल्ल्याची होत असलेली नासधूस इतिहास अभ्यासक आणि गडप्रेमी नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरल्याचीच सध्या चर्चा आहे.

टॅग्स :fireआग