शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मालमत्ताकराची ९६ कोटींची केली वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:35 AM

वसई विरार महापालिकेने २०१८-२०१९ मध्ये विक्र मी मालमत्ता कराची वसुली केली होती.

नालासोपारा : वसई विरार महापालिकेने २०१८-२०१९ मध्ये विक्र मी मालमत्ता कराची वसुली केली होती. त्यानुसार यंदाही त्याहून अधिक कराची वसुली करण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज झाली असून आतापर्यंत या सहा महिन्यात ९६ कोटींची मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे.वसई विरार शहरात ७ लाख ४२ हजार औद्योगिक व वाणिज्य असे मालमत्ताधारक आहेत. मालमत्ता कराची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ असून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ९६ कोटींचा टप्पा पालिकेने पूर्ण केला आहे. गेल्यावर्षी ८१ कोटी ५४ लाख इतका कर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता.त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटींची जादा वसुली झाल्याचे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना आणि सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ही करवसुली थंडावली, असे वाटत होते. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा टप्पा गाठला असून पुढे मार्चपर्यंत ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवल्याचे पालिकेने सांगितले.।विशेष मोहीम हाती घेणार३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुदत असणार असून त्यानंतर २ टक्के दंड लाऊन कराची रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच कर भरण्यासाठी नागरिकांना सूचित करण्यात येईल. तसेच यासह कर्मचारी आणि अधिकारी यांचे पथक तयार करून विशेष मोहीम काही दिवसात हाती घेण्यात येईल, असेही तळेकर यांनी सांगितले.२०१८-२०१९ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने या वर्षी कंबर कसली होती. त्याचे फळ पालिकेला मिळाले होते. ३१ मार्चपर्यंत एकूण २२१ कोटींची मालमत्ता कराची वसुली पालिकेतर्फे करण्यात आली होती. २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात पालिकेने १६४ कोटी रूपये इतका मालमत्ता कर वसूल केला होता.