वसई-विरारमध्ये ८१२ दहीहंड्या

By Admin | Updated: September 5, 2015 22:39 IST2015-09-05T22:39:57+5:302015-09-05T22:39:57+5:30

वसई-विरार उपप्रदेशात सुमारे १९० सार्वजनिक दहीहंड्या असून त्यापैकी सर्वाधिक दहीहंड्या विरार शहरात आहेत. खाजगी व सार्वजनिक अशा एकूण ८१२ दहीहंड्याचा थरार रविवारी

812 Dahihandas in Vasai-Virar | वसई-विरारमध्ये ८१२ दहीहंड्या

वसई-विरारमध्ये ८१२ दहीहंड्या

वसई : वसई-विरार उपप्रदेशात सुमारे १९० सार्वजनिक दहीहंड्या असून त्यापैकी सर्वाधिक दहीहंड्या विरार शहरात आहेत. खाजगी व सार्वजनिक अशा एकूण ८१२ दहीहंड्याचा थरार रविवारी पाहायला मिळणार आहे. यंदा पावसाचा लपंडाव असला तरी बालगोपाळ चाळीतल्या तार्इंना भिजविण्याचे आवाहन करणार आहेत.
दरवर्षी वसई-विरार परिसरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा पावसाने दहीकाल्यापूर्वीच दडी मारल्याने सरावालाही तेवढी गर्दी दिसत नव्हती. मात्र, असे असले तरी दहीहंडी व रविवार एकत्र आल्याने शहरातील मंडळांमध्ये जोशाचे वातावरण आहे. आॅफिसच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये रमणारी तरुणाई दहीकाल्यानिमित्त हाफ पॅण्ट अन् बनियानवर पाहायला मिळणार आहे.
उपप्रदेशात ६२२ खाजगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. सालाबादप्रमाणे महानगरपालिकेने यंदाही गोविंदांचा विमा उतरवला आहे. तर, दुसरीकडे काही हॉस्पिटल प्रशासनाने गोविंदा खाली पडून जखमी झाल्यास मोफत उपचार व फ्री अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देऊ केली आहे.

Web Title: 812 Dahihandas in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.