ठाण्यात ७८ उमेदवार, १०३ अर्ज
By Admin | Updated: September 27, 2014 00:14 IST2014-09-26T23:55:26+5:302014-09-27T00:14:00+5:30
युती आणि आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील १० आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले.

ठाण्यात ७८ उमेदवार, १०३ अर्ज
ठाणे : युती आणि आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील १० आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतून ७८ उमेदवारांनी १०३ निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. उमेदवारांनी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे़
बुधवारी सर्वपित्री अमावस्या संपताच बुधवारी ९ उमेदवारांनी १२ अर्ज तर गुरुवारी जिल्ह्यातून २६ उमेदवारांनी ३६ अर्ज भरले होते. शुक्रवारी ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, ओवळा-माजिवडा संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, मनसेचे ज्येष्ठ
नगरसेवक सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आसीफ शेख, कोपरीतून शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदे, भाजपाचे माजी नगरसेवक संदीप लेले, कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेतर्फे माजी आमदार
सुभाष भोईर, मनसेचे विद्यमान आमदार रमेश पाटील, मुरबाडमधून भाजपातर्फे विद्यमान आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे
वामन म्हात्रे, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार गोटीराम पवार, कल्याण पश्चिममधून मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर, अंबरनाथमधून विद्यमान
आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच शहापूरमधून बहुजन
विकास आघाडीतर्फे आदिवासी नेते गोपाळ रेरा, तर बेलापूरमधून माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी अर्ज भरले आहेत.