जव्हारमध्ये वीज पडून 7 वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर एक मुलगी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 01:29 PM2021-10-13T13:29:43+5:302021-10-13T13:29:58+5:30

विजेचा धक्का थेट घराचे कौलं फोडून घरात खेळत असलेला 7 वर्षीय चिमुकला सुमित भुरकुड याच्या अंगावर पडली

7-year-old boy dies after being struck by lightning in Jawahar; So a girl injured | जव्हारमध्ये वीज पडून 7 वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर एक मुलगी जखमी 

जव्हारमध्ये वीज पडून 7 वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर एक मुलगी जखमी 

Next

हुसेन मेमन, जव्हार

जव्हार तालुक्यातील तिलोंडा येथील एका घरावर मंगळवारी सायंकाळी वीज पडून 7 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आहे.

मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील काही ठिकाणी वादळी व वीज कडाक्याचा पाऊस सुरू झाला दरम्यान तिलोंडा येथील कृष्णा भुरकुड यांच्या घरावर सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आकाशातून नैसर्गिकरित्या वीज कोसळली. विजेचा धक्का थेट घराचे कौलं फोडून घरात खेळत असलेला 7 वर्षीय चिमुकला सुमित भुरकुड याच्या अंगावर पडली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर घरात काम करत असलेली 16 वर्षीय कृष्णाची बहीण परिमा हिला धक्का लागला यात तिला गंभीर दुखापत झाली असून, तिला तातडीने सायवण येथील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे, तिची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान घराचेही मोठे नुकसान झोले असून, नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी भुरकुड कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 7-year-old boy dies after being struck by lightning in Jawahar; So a girl injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app