तालुका विज्ञान प्रदर्शनात ६५ प्रकल्प
By Admin | Updated: December 24, 2016 02:37 IST2016-12-24T02:37:18+5:302016-12-24T02:37:18+5:30
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातून एकूण

तालुका विज्ञान प्रदर्शनात ६५ प्रकल्प
विक्रमगड : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातून एकूण ६५ प्रकल्प सादर केले यामध्ये जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, धूम्रपानामुळे होणारे दुष्परिणाम, पवनचक्की, सौरउर्जा, अन्न सुरक्षा, प्लॅस्टिक एक भस्मासूर, पूर परिस्थितीची पूर्वसूचना, सेंद्रीय कीटकनाशक व सजिवक प्रकल्प, विजेची बचत अशा विविध सामाजिक जाणिवेतून बाल वैज्ञानिकांनी हे प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी रहाणे. प्रमिला काकड, सिंधुताई भोये पंचायत समिती सदस्य, सभापती मधुकर खूताडे, गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, पालक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)