कुंटणखान्यातून ६ जणींची मुक्तता
By Admin | Updated: April 1, 2017 05:09 IST2017-04-01T05:09:49+5:302017-04-01T05:09:49+5:30
माणिकपूर शहरात एका घरात सुरु असलेला कुंटणखाना अ़नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने उघडकीस आणला.

कुंटणखान्यातून ६ जणींची मुक्तता
विरार : माणिकपूर शहरात एका घरात सुरु असलेला कुंटणखाना अ़नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने उघडकीस आणला. त्यातून सहा पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. माणिकपूर शहरात आनंद नगरमधील रोजमॅक इमारतीमधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये देहविक्रेय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने काल रात्री उशिरा छापा मारला.
छाप्यात व्यवसायासाठी आणलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली असून त्या वीस ते पंचवीस वयोगटातील असून नालासोपारा आणि भाईंदर येथील रहिवासी आहेत.
कुंटणखाना चालवणाऱ्या नर्गीस शहीद खान (४०) आणि ललित अशोक तांबे (३७) या दोघांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)