५० कि.मी.चा वळसा
By Admin | Updated: March 17, 2017 05:43 IST2017-03-17T05:43:58+5:302017-03-17T05:43:58+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर खाडीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरु असल्याने वसई विरारकडे जाणाऱ्या वाहनांना ५० कि मी चा वळसा घालून जावे लागते आहे

५० कि.मी.चा वळसा
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर खाडीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरु असल्याने वसई विरारकडे जाणाऱ्या वाहनांना ५० कि मी चा वळसा घालून जावे लागते आहे. ती वाहने टेन नाका येथे न अडवता कामण चिंचोटी मार्गे सोडावीत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
घोडबंदर खाडीवरील पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे त्यामुळे गुजरातच्या वाहनांमुळे टेण नाका तसेच वाडा भिवंडी मार्गावर कोंडी होत आहे. त्यामुळे विरार वसई नालासोपारा नायगाव परिसरात जाणाऱ्या मालवाहू वाहनांना टेन नाका येथे न अडवता थेट सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)