सैनिकांसाठी ५०० युनिट रक्त जमा

By Admin | Updated: May 2, 2017 01:47 IST2017-05-02T01:47:41+5:302017-05-02T01:47:41+5:30

भारतीय लष्कर व नौदलाचे जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन रविवारी डहाणू येथील सेंट मेरी हायस्कुलमध्ये

500 units of blood deposit for the soldiers | सैनिकांसाठी ५०० युनिट रक्त जमा

सैनिकांसाठी ५०० युनिट रक्त जमा

बोर्डी : भारतीय लष्कर व नौदलाचे जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन रविवारी डहाणू येथील सेंट मेरी हायस्कुलमध्ये करण्यात आले होते. डॉ. अमित नाहर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला डहाणूतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने सुमारे पाचशे युनिट रक्त जमा झाले. या वेळी लष्करी अधिकारी व जवान उपस्थित होते. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, अ‍ॅड रमेश नाहर, उपसभापती लतेश राऊत, डहाणूचे उपनगराध्यक्ष प्रदीप चाफेकर, शिवसेना नेते उदयबंधु, रक्ताचे नाते या संस्थेचे अध्यक्ष राम बांगर, प्रकाश बोरा हे उपस्थित होते. या निमित्ताने ५०० युनिट रक्तदानाचा प्रतिष्ठानचा संकल्प पूर्णत्वास आला. पुण्यातील रक्ताचे नाते संस्थेचे अध्यक्ष राम बांगर यांनी १२० व्या वेळी रक्तदान केल्याने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी दात्यांना प्रमाणपत्र व झाड लावण्यासाठी कुंड्या भेट देण्यात आल्या.

Web Title: 500 units of blood deposit for the soldiers