शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वाहन कर्जाद्वारे ‘युको’ला ५ काेटी ४४ लाखांचा गंडा; डीलर, ग्राहकांसह ९२ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:59 IST

बनावट ग्राहक व बनावट कागदपत्रांद्वारे संगनमताने हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. 

मीरा रोड : मीरा रोडमधील युको बँक शाखेतून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या विविध चारचाकी वाहनांच्या कर्जाची रक्कम न भरता पाच कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांना बँकेची फसवणूक करणाऱ्या कार डीलर व ग्राहक अशा ९२ जणांवर मीरा रोड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे. बनावट ग्राहक व बनावट कागदपत्रांद्वारे संगनमताने हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. 

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात युको बँकेची शाखा आहे. या शाखेतून १ फेब्रुवारी २०१२ ते ३० नोव्हेंबर २०१२ दरम्यान हा सर्व वाहन कर्ज घोटाळा घडला आहे. या काळात भाईंदर, मीरा रोडसह नवी मुंबई भागातील काही कार डीलर्सच्या माध्यमातून युको बँकच्या या शाखेतून चारचाकी वाहनांची वाहन कर्जे घेण्यात आली होती. या कर्जाची रक्कम ५ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपये इतकी थकीत आहे. ग्राहकांनी वाहन कर्जाचे हप्तेच भरले नाहीत. बँकेने नंतर कर्ज वसुलीसाठी शोध घेतला असता ग्राहक तर मिळाले नाहीतच, शिवाय वाहनेदेखील सापडली नाहीत. काही कार डीलर्स तर त्यांची दुकाने बंद करून पसार झाले. 

ठाणे न्यायालयात बँकेची याचिका  वाहन कर्जात मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेच्या वतीने ठाणे न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी २१ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.   अखेर ७ मार्च २०२४ रोजी बँकेच्या वतीने गौरवकुमार सहा यांनी फिर्याद दिल्यावर मीरा रोड पोलिसांनी कार डिलर्सचे मालक व ग्राहक असे मिळून ९२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण वंजारी हे तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस