शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:23 AM

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत.

संजु पवार ।विरार : पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत. त्यातील १४७ जणांच्या वारसांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरवाज्यात लटकणे, गर्दीच्या वेळी हात निसटून पडणे, आत्महत्या , चालुु गाडी पकडण्याचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.सफाळे , केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणु रोड, बोर्डी, घोलवड या नऊ रेल्वे स्थांनका दरम्यान मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा सुरू झाली. क्षणार्धात वेग पकडणाºया लोकलचा अंदाज न आल्यानेही अपघात घडून प्रवाश्यांचा जीव गेला आहे. या परिसरात गेल्या ४३ महिन्यांमध्ये ४८१ अपघातात ठार झाले आहेत. यातील ३३४ मृत्युंचा छडा लाऊन पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत. मात्र मृतांपैकी १४७ जणांची अद्याप ओळख न पटल्याने पेच वाढला आहे.वैतरणा परिसरातील रेल्वे खांब क्र.१६९/७ ते घोलवड परिसरातील रेल्वे खांब १३५/१७ दरम्यान हे सर्व अपघात घडून आले आहेत. दुसरीकडे, रेल्वेकडून खूपच कमी अनुदान मिळते. अनुदान वाढवून मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पी आय प्रमोद बाबर यांनी दिली.