शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा येथे ४ मजल्यांची इमारत कोसळली; रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 08:38 IST

इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

नालासोपारा : - पूर्वेकडील संकेश्वर नगर येथील साफल्य नावाची चार मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत दहा वर्ष जुनी असून मंगळवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. इमारत कोसळत असल्याच्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र सर्व रहिवासी इमारतीतून बाहेर येताच अवघ्या काही क्षणातच ही इमारत पत्याप्रमाणे कोसळली.

इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

 

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड येथे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडली होती. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली  इमारत कोसळली हाेती. या दुर्घटनेत १६ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची जबाबदारी असणारे विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे आणि युनूस अब्दुल रज्जाक शेख यांच्यावर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना