विरार लोकलच्या डब्यात मारहाण , ४ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:09 IST2018-02-23T02:09:44+5:302018-02-23T02:09:46+5:30

लोकलच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

4 injured in Virar local cab, 4 injured | विरार लोकलच्या डब्यात मारहाण , ४ जण जखमी

विरार लोकलच्या डब्यात मारहाण , ४ जण जखमी

वसई : लोकलच्या डब्यात जागेवरून झालेल्या वादात एका टोळक्याने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास विरार रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यात घडली. कळवा येथे राहणाºया प्रजापती कुटुंबातील २० जण जीवदानी देवीच्या दर्शनासाठी विरारला आले होते. रात्री आठच्या सुमारास लोकलमध्ये बसण्यावरून एका गटाशी त्यांचा वाद झाला. त्यावेळी आठ जणांच्या टोळक्याने त्यांना बेल्टने मारहाण केली. तसेच प्रजापती कुटुंबियांचे सामान गाडीबाहेर फेकून दिले.
या मारहाणीत राममिलन प्रजापती (७०), भानामती प्रजापती (६५), रामसुरत प्रजापती (३३) आणि कृपाल प्रजापती (२२) हे जबर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री किशोर भालेराव (३१), सागर गायकवाड (१९) आणि रोहित गायकवाड (१८) यांना अटक केली.
वसई कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: 4 injured in Virar local cab, 4 injured