वाड्यात ४ ग्रामपंचायती अविरोध
By Admin | Updated: April 10, 2016 00:52 IST2016-04-10T00:52:22+5:302016-04-10T00:52:22+5:30
तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार

वाड्यात ४ ग्रामपंचायती अविरोध
वाडा : तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सापरोंडे, कळंभे, मांडवा, आखाडा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६६ ग्रामपंचायतीत २१९ मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून एक हजार दोनशे पन्नास कर्मचारी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी दिली.
बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या निवडणुका होत असून ग्रामपंचायत पातळीवर पक्षीय राजकारण खेळले जात नसले तरी राजकीय पुढारी व नेत्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे काही ग्रामपचांयती निवडणूका पक्षिय पातळीवर होतील असे चित्र दिसत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आर.पी.आय, बहुजन विकास आघाडी या सर्वच पक्षांच्या नेत्यांची मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.
तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुका म्हणून कुडूस, वडवली, नारे, कोणसई, जामघर, बिलोशी, कोंढले, डाकिवली, घोणसई, चिखले खानिवली या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेकांविरोधात पॅनल उभे केले असून येथे अत्यंत रंगतदार व चुरशीची निवडणूक होणार आहे तर नारे गावात आताच वातावरण तापले असून पोलीसांनी गस्त चालू केली आहे. भाजपाचे कुंदन पाटील तर दुसरे पॅनल प्रमुख सुधीर पाटील यांच्या रस्सीखेच सुरू आहे.
औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चुरशीच्या होणार आहेत. सत्तेत असणारे विजयी होतात की त्यांना पराभव स्वीकारावा लागतो हे येत्या १७ तारखेला दिसून येईल.
कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेका- ंविरोधात पॅनल उभे केले आहे