विरार रेल्वे स्थानकात ३२ वर्षीय व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाने वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:16 IST2021-02-26T23:16:07+5:302021-02-26T23:16:14+5:30
किशोर नाईक असे या व्यक्तीचे नाव आहे.

विरार रेल्वे स्थानकात ३२ वर्षीय व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाने वाचवले प्राण
विरार : विरार येथे लोकल ट्रेनच्या रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. यावेळी रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी या व्यक्तीला पाहिलं आणि तात्काळ धाव घेत त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केले. किशोर नाईक असे या व्यक्तीचे नाव आहे.
२४ फेब्रुवारी २०२१ रोजी विरार रेल्वे स्थानकात रेकिशोर नाईक रेल्वे रुळावर झोपल्याचे विरारचे आरपीएफचे निरीक्षक प्रवीण कुमार यांनी पाहिले. त्यांनी आपला जीवाची पर्वा न करता पळत जाऊन त्याचा जीव वाचवला.आत्महत्या करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले.या व्यक्तीच्या आईचे निधन झालं होते आणि त्यामुळे तो नैराश्यात होता. यानंतर त्याने
आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विरार रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्या व्यक्तीला रेल्वे रुळावर झोपलेलं पाहिलं आणि त्याचवेळी समोरून लोकल येत होती. यावेळी आरपीएफ जवानांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केलं. यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.