शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चावी विक्रेत्याला तीन लाख नुकसानभरपाई; मानवी हक्क आयोगाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 09:03 IST

आयोगाने कडक ताशेरे ओढून कारवाई करण्याचे निर्देशही पाेलिसांना दिले आहेत.

नालासोपारा : कष्टाच्या २० रुपयांच्या मजुरीसाठी एका गरीब चावी विक्रेत्याला पोलिस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण करून त्याचे नाक फोडल्याची घटना १६ मे रोजी घडली होती. या घटनेची मानवी हक्क आयोगाने दखल घेऊन त्याला तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मीरा-भाईंदर, वसई-विरारपोलिस आयुक्तालयाला दिले आहेत. आयोगाने कडक ताशेरे ओढून कारवाई करण्याचे निर्देशही पाेलिसांना दिले आहेत.

मोहम्मद अली अन्सारी (वय ३३) यांचा माणिकपूर पोलिस ठाण्याच्या समोर चावी बनविण्याचा व्यवसाय आहे. १६ मे रोजीच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दोन चाव्या बनविण्यासाठी या ठिकाणी आली होती. या चाव्यांची ८० रुपये मजुरी होत असल्याचे सांगण्यात आले होते. चाव्या बनवून झाल्यानंतर आपण पोलिस असल्याची बतावणी करून केवळ ६० रुपये देऊन त्या व्यक्तीने अन्सारी यांना दमदाटी केली होती. या संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढत मारहाण केलेल्या मोहम्मद अन्सारी याला  नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

२० रुपयांसाठी  फोडले नाक

उर्वरित २० रुपये या व्यक्तीने देणे आवश्यक असतानाही सरगरे यांनी उलटपक्षी अन्सारी यांना शिवीगाळ, दमदाटी करीत पोलिस ठाण्यातच मारहाण केली. 

या मारहाणीदरम्यान त्यांच्या नाकावर जोरात प्रहार केल्याने अन्सारी रक्तबंबाळ झाले. यात नाकाचे हाड तुटून त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पोलिस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांच्याविरोधात गुन्हा माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सलगरे यांना पोलिस सेवेतून निलंबितही करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVirarविरारPoliceपोलिस